मुळात लिव्ह इन रिलेशनशिप ही लग्नाला पर्यायी नाही किंवा अल्टिमेट स्टेज देखिल नाही. मी स्वतः लग्नापूर्वी अश्या लिव्ह इन मध्ये राहत होतो, नंतर आम्ही लग्न केलं. त्यामुळे लिव्ह इन् ही फक्त एक स्टेज आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेसारख्या देशांमध्ये देखिल हे असेच आहे, म्हणजे लिव्ह इन कडे लोक लग्नाला पर्याय म्हणून बघत नाहीत. 
लिव्ह इन चा अर्थ आणि त्याची गरज ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. उदा. काही कारणांमुळे एव्हढ्यात लग्न करणं शक्य नाही, किंवा मुलगा किंवा मुलगी एकमेकांपासून खूप दूर राहतात. किंवा दोघं वेगळ्या शहरात एकत्र आहेत वगैरे... ह्या व अश्या प्रकारच्या कारणांमुळे लिव्ह इन ही टेंपररी व्यवस्था अस्तित्वात आली. आता राहिला मुद्दा सेक्स चा, लग्नापूर्वी सेक्स ला कायद्याने विरोध नाही. त्यामुळे दोघांचा शारीरिक संबंध हा वेगवेगळ्या घरात राहून असो किंवा एका घरात (म्हणजे लिव्ह इन), काय फरक पडतो? 
त्यामुळे लिव्ह इन ला विरोध करणाऱ्यांनी आपण नक्की कशाला विरोध करतो आहोत हे ठरवावे...