१) ....मी स्वतः लग्नापूर्वी अश्या लिव्ह इन मध्ये राहत होतो, नंतर आम्ही लग्न केलं. त्यामुळे लिव्ह इन ही फक्त एक स्टेज आहे.

सौरभ, लिव्ह-इनचं रुपांतर लग्नात झालं हे अत्यंत विधायक घडलं आणि.. लग्न, ती कमीटमेंट, हाच तर या लेखाचा हेतू आहे. 

२) ....लिव्ह इन चा अर्थ आणि त्याची गरज ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. उदा. काही कारणांमुळे एव्हढ्यात लग्न करणं शक्य नाही, किंवा मुलगा किंवा मुलगी एकमेकांपासून खूप दूर राहतात. किंवा दोघं वेगळ्या शहरात एकत्र आहेत वगैरे... ह्या व अश्या प्रकारच्या कारणांमुळे लिव्ह इन ही टेंपररी व्यवस्था अस्तित्वात आली.

याला समाजमान्य पर्याय वाङनिश्चय आहे, त्यात एकमेकांची-एकमेकांना, दोन कुटुंबांची देखील आपापसात बांधीलकी आहे, मग तुम्ही लग्न केव्हाही करा, वेगवेगळ्या शहरात रहा, शारीरिक एकरूपता साधा  तुमची मर्जी, कारण तुमचा हेतू शुद्ध आहे, तुम्ही लग्न करणार आहात

३).....त्यामुळे लिव्ह इन ला विरोध करणाऱ्यांनी आपण नक्की कशाला विरोध करतो आहोत हे ठरवावे

विरोध नाही,  मी कोण विरोध करणार? सुप्रीम कोर्टनं परवानगी दिलीय! धोका काय आहे ते सांगतोय. जर 'जमलं तर बघू नाही तर आता मजा करायला काय हरकत आहे, पुढचं पुढं बघू' हा दृष्टीकोन असेल तर मग फक्त अनिर्बंध आणि अनेकविध सहवास असं या अरेंजमेंटचं स्वरूप राहील.

मनाचं स्वरूपंच असं आहे की 'आपलं नाही जमतनां, आपण कुठे लग्नाचं ठरवलंय? चला उघडा पुढचं पान! कारण मन चंचल आहे, बेजवाबदार आहे, यातून कुटुंब व्यवस्था खरं, तर विवाहसंस्थाच संपून जाईल आणि त्याचे दूरगामी सामाजिक परिणाम होतील जे पाश्चिमात्य देशात दिसतायंत.

४) आता मजा अशी आहे की या अरेंजमेंट मधून स्त्रियांना 'कौटुंबिक छळापासून संरक्षण आणि पोटगी हवीयं" आता बोला!

सौरभ, प्रतिसादा बद्दल आभार.

संजय