संजयजी आपले विचार पूर्णार्थाने निदान भारतीय विचारसरणीशी सुसंगत आहेतं. न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय देऊन उगीचच गोंधळ घातला आहे असे वाटतें  निदान भारतीय मानसिकता तरी लिव्ह इन संबंधाना अनुकूल नाही. अमेरिकेत व एकूणच पाश्चात्य राष्ट्रात  विवाहपूर्व शरीरसंबंध जणू आवश्यकच समजले जातात.असे मी म्हणण्याचे  कारण  म्हणजे मी  वाचलेल्या निदान  शंभराच्या वर इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये  (आणि त्याही आर्थर हेले,  सिडने शेल्डन , रॉबीन कुक अशा नामवंत लेखकांच्या)विवाहपूर्व व विवाहबाह्य शरीरसंबंध  अतिशय  मामुली चीज  असल्यासारखे  दाखवले आहेत. एका कादंबरीत तर एका  युवतीला वयाच्या पंचविशीपर्यंत आपला कौमार्यभंग आला नाही हे सांगण्याची लाज वाटते.तर आपल्याकडे आजपर्यंत तरी   विवाहपूर्व व विवाहबाह्य शरीरसंबंध अपवादात्मकच आढळतात. मध्यंतरी लिव्ह इन संबंध असणाऱ्या भारतीय जोडप्यांना  दूरदर्शनवरील  एका वाहिनीवर बोलावून  त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यात त्या जोडप्यांच्या  मनात  कोठेतरी खंत  असल्याचे  जाणवले.अगदी अमेरिकेतही विवाहबाह्य संबंध सरसहा होत असले तरी बिल क्लिंटनवर त्याबद्दल इंपीचमेंट होण्यापर्यंत मजल गेली होती.( सुदैवाने हिलरीने मनाचा थोरपणा दाखवून आपला विवाह व नवरा दोघानाही वाचवले.) थोडक्यात तिकडेही ही गोष्ट नेहमीचीच असूनही अयोग्यच समजली जाते. अगदी जंगली प्राण्यांमध्ये ( निदान लांडग्यांच्या बाबतीत तरी ) एकपत्नित्व आवश्यक समजले जाते. त्याचा भंग करणाऱ्या लांडग्यास कळपाबाहेर हुसकण्यात येते असे मी नुकतेच वाचले आहे.अर्थात प्राण्यांचे विवाह माणसासारखे वाजतगाजत व कायदेशीरपणे होत नाहीत हेही खरेच !