'प्रेम' हा विषयच आकर्षक आहे. आपणही तो छान रंगवलाय.
कथा संपेपर्यंत वाचन थांबवत नाही.
परंतू, जाणवणारे काही मुद्दे / प्रश्न असेः-
कथा क्रमशः आहे का? की ती इथेच संपते?
'क्षणभंगूर' या शिर्षकातून आपणास काय सुचवायचे आहे?
लेखनातील काही चुका या योग्य अक्षर उपलब्ध नसल्यामुळे झाल्या आहेत का?
उदाहरणार्थ, 'शून्यात' ऐवजी 'शुण्यात' असा उल्लेख.
'गूगल' अथवा 'वराह' सारखे पर्याय इथे उपयोगी ठरू शकतात.
तसेच,
'मी शोधेल कॉलेज' ऐवजी 'मी शोधेन कॉलेज' अधिक योग्य ठरावे.
या ठिकाणी बोलीभाषेचा प्रत्यय जाणीवपूर्वक दिला जात असल्यास सूचित बदल अनावश्यक ठरेल.
कथा उत्तम जमलीच आहे. परंतु, वरील मुद्यांचा खुलासा कथेस अधिक खुलवेल.
पु. ले. शु.