'मानवी मन (मग ते स्त्रीचं असो की पुरुषाचं) आणि त्यातून सोडवणूक' हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे त्यामुळे मन काय काय चकवे देतं आणि आपण त्यात कसे सापडतो हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू असतो.
'लिव्ह-इन' हा मनानी शोधलेला 'लग्न आणि डिवोर्स' यातला नवा चकवा आहे. मनाला लग्नाची जवाबदारी नको आणि डिवोर्सचा त्रासही नको आहे पण सहजीवनाची मजा तर हवी आहे हा तो चकवा आहे!
एका देखण्या इंग्लीश कवीनी (बहुदा बायनर) त्याच्या आठवणीत लिहिलं आहे की त्याला बेसुमार देखण्या स्त्रिया वश होत्या पण एक युवती त्याला जाम देत नव्हती. आता मनाचं असं आहे की त्याला जे नाही तेचं हवं आणि आहे ते नको असतं! बायनरनी मोठ्या मिन्नतवारीनं तिची मर्जी संपादन केली पण ती म्हणाली की तू माझ्याशी लग्न करणार असशील तरच माझा सहवास तुला लाभेल नाही तर पुढे काही नाही. बायनर तिच्यावर इतका फिदा होता की तो लग्नाला लगेच तयार झाला. बायनरनी लिहिलं आहे की 'आम्ही चर्चमध्ये जाऊन रितसर लग्न केलं, मी मोठ्या आनंदात तिचा हात हातात घेऊन चर्चच्या पायऱ्या उतरत होतो तेवढ्यात समोरून एक अत्यंत देखणी युवती चर्चमध्ये येताना मला दिसली.. माझ्या हातातून माझ्या नवपरिणीत वधूचा हात नकळत सुटला आणि मी भान विसरून त्या ललनेकडे बघायला लागलो!'
ही मजा दोन्हीकडे आहे, माझ्या एका मित्राचे दोन डिवोर्स झाले आहेत आणि त्याची तिसऱ्या लग्नाची तयार चालू आहे, तो मुलींना जेव्हा फोन करतो तेव्हा दोनच प्रकारची उत्तरं येतात 'एकतर 'मी सध्या लिव्ह-इन मध्ये आहे' किंवा दोन 'मी सध्या केस मध्ये आहे' (म्हणजे डिवोर्सची प्रोसेस चालू आहे)! माझ्या पंचवीस वर्षाच्या एका नातेवाईकाचा लग्नानंतर जेमतेम वर्षानंतर डिवोर्स झाला (त्याला हल्ली हे लोक म्युच्युअल म्हणतात). आमच्या अगदी जवळच्या नात्यातला डिवोर्स होता होता केवळ मूल (दुसरं) झाल्यामुळे वाचला! माझ्या मते तरी भारतात लग्नाची परिस्थिती चिंताजनक आहे.
संजय