आपल्याला आपली शहरे आणि गावे सुधारण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी फ़ार मोठा अवधी नको किंवा मोठी गुंतवणूक नको. हे सर्व सध्याच्या आर्थिक चौकटीत करणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे ती समाजभिमुख नेते आणि जागरुक तळ्मळ असलेल्या नागरिकांची...
एका दिशेचा शोध       लेखक- संदीप वासलेकर
संदिप वासलेकर यांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकातील त्यांचे हे मत . आपण प्रत्येक घटनेस काळ हेच एकमेव औषध मानत असतो,किंवा प्रत्येक घटनेच्या पाठीमागे आपण मोठ्या अर्थकारणाची गणिते जोडत असतो.मात्र इच्छा असेल तर मार्ग सापडतो. या विचाराचा आपल्याला विसर कसा पडू शकतो ते मला कळत नाही. ज्यांना बदलाची भूक आहे असे १० माणसं जरी एकत्र आले तरी ते सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल घडवून आणू शकतात. समाजातील काही जागरुक नागरीक हा बदल घडवून आणू शकतात.