विवाहेतर सहजीवन ( 'विवाहा-शिवाय सहजीवन' म्हटलं तर आणखी स्पष्ट होईल) यात फरक आहे.

पहिली गोष्ट बेकायदा नाही, दुसऱ्या गोष्टीवर विवाहाचंच नियंत्रण आहे  (शिवाय व्यभिचार (ऍडल्टरी) हा आय. पी. सी. खाली गुन्हा आहे) आणि तिसरी गोष्ट विवाहसंस्थेलाच हरताळ फासणारी आहे.

मला पहिल्या दोन गोष्टीं विषयी काही म्हणायचं नाही तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि जवाबदारी आहे. हा लेख तिसऱ्या पर्याया विषयी आहे. 

तुम्ही पूर्ण विषय लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल सर्वोच्च न्यायालयानि जेव्हा पहिला निर्णय दिला तेव्हा त्यांची बहुदा तुमच्या सारखीच कल्पना झाली की दोन सज्ञान अविवाहित स्त्री-पुरुषांचं एकत्र येणं हा गुन्हा नाही (मग ते विवाहपूर्व असो की विवाहेतर असो), मग पुढे जाऊन अत्यंत तर्कसंगतपणे हा विषय 'विवाहेतर सहजीवनाला' मिळाला, कारण जर अविवाहितांचा शारीरिक संबंध बेकायदा नाही तर मग एकत्र सहजीवन (सहनिवास) बेकायदा ठरत नाही आणि इथे मग मुद्दा सरळसरळ विवाहसंस्थेलाच शह देतो.

तुम्ही नीट बघीतलं तर २२/१० ला सर्वोच्च न्यायालयानी आधी दिलेला स्वतःचा  निर्णय संपूर्णपणे फिरवला आहे फक्त ते  (लिव्ह-इन ची अनिर्बंधता हवी असणाऱ्या) विवाहेच्छुकांच्या लक्षात येत नाहीये पण तुमच्या सहज लक्षात येईल आणि तोच माझ्या लेखाचा शेवट आहे!

संजय