तुम्ही आय. आय. टीयन आहात म्हणजे तुम्ही निर्विवादपणे बुद्धीमान आहात पण प्रत्येकजण तुमच्यामध्ये रस जर त्याचा फायदा असेल तरच घेतो, म्हणजे जर माझ्या बुद्धीचा तुम्हाला काही उपयोग असेल तरच तुम्ही माझ्याकडे लक्षं द्याल ही वस्तुस्थिती आहे.
पहिल्या प्रसंगात जर पलिकडल्या सीटवर एखादा हस्तसामुद्रिक बसला असता तर कदाचीत हवाई सुंदरीच काय खुद्द पायलट सुद्धा, वेळात वेळ काढून, को-पायलटकडे विमान सोपवून, हात दाखवायला आला असता.
दुसऱ्या प्रसंगात त्या सुरक्षा अधिकाऱ्याला आय. आय. टी. काय चिज आहे हे माहीती असण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे तो विद्बतेनी भारावला असण्याची शक्यता ही तितकीच कमी आहे. तुम्हाला बोट बघायला मिळाली ती कुलकर्णी आला म्हणून (आणि तुम्ही ही तिथे 'योगायोगानी' हा योग्य शब्द वापरला आहे).
माझा अनुभव सांगतो, तुम्हाला जर "विद्वान सर्वत्र पूज्यते" म्हणजे नक्की काय आहे हे बघायचं असेल तर इथे सर्वांना उपयोगी होईल आणि ज्यात तुम्ही निष्णात आहात अशा विषयावर लिहून त्यावर येणारे प्रतिसाद बघा आणि मग त्यांना उत्तरं द्या, सॉलिड मजा येते!
संजय