संबंधितांच्यामानसिकतेचा आहे. बहुसंख्य लोकांच्या मनांत नसेल तर लीव्ह इन नसलें तरी लग्नसंस्था टिकणार नाहीं. लीव्ह इनचा लग्नसंस्थेशीं लावलेला संबंध मला तरी तार्किकदृष्ट्या निराधार वाटतो. त्यामुळें लेखकाचें
लिव्ह इन
रिलेशन्शिप’ ला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिल्यामुळे भारतातली कुटुंब
व्यवस्थाच धोक्यात येणार आहे
हें मत पटण्यासारखें नाहीं. माझ्या परिचयाच्या एका सज्जन गृहस्थाची पत्नी बरीच वर्षें अर्धांगवायूनें बिछान्याला खिळून होती. त्यानें प्रथम पत्नीचा व दोन मुलांचा संपूर्ण भार व्यवस्थित उचलला पण दुसऱ्या स्त्रीबरोबर लीव्ह इन संबंध ठेवले. अंतर दिलें नाहीं. पण दुसरीशीं लग्न केल्यास प्रथम पत्नीचा एखादा नातेवाईक त्याला द्विभार्याप्रतिबंधक कायद्याखाली अडकवायला उद्युक्त करूं शकतो म्हणून तो दुसरीशीं लग्न करूं शकत नव्हता. पहिलीला घटस्फोट द्यावा तर पहिलीच्या पोटगी वगैरेचा प्रश्न त्वरित उभा राहिला असता आणि प्रचंड मनस्ताप होऊं शकत होता . दुसरीला पण एक मुलगा आहे आणि तें दुसरें कुटुंब पण सुखी आहे. हा कामगार दर्जाचा कनिष्ठ मध्यमवर्गीय गृहस्थ रोज दुसऱ्या घरून डबा घेऊन कामावर येतो, कामावरून घरीं जातांना प्रथम पहिल्या घरीं जातो, हवें नको बघतो , मुलांमुलींशीं हास्यविनोद करतो मग जेवून दुसऱ्या घरीं जातो. मीं शा महिने त्याला व्यवस्थित जवळून पाहिलें आहे. चारसाडेचारशें कामगारांपैकी कोणीही त्याला वाईट म्हणत नाहीं.
बिल क्लिंटनविरुद्ध प्रसारमाध्यमांनीं राळ उडवली होती ती संबंध प्रथम खोटें बोलून नाकारून नंतर पुरावे दाखवल्यावर कबूल केल्यामुळें. देशाचा प्रथम नागरिक खोटें बोलून जनतेची दिशाभूल करतो हा मुद्दा होता. विवाहबाह्य संबंध नव्हे.
असो पण प्रत्येकाचें मत वेगळें असूं शकते व अशा मुद्द्यांवर चर्चा जरूर व्हावी. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर