हा विवाहबाह्य संबंध आहे, सकृत दर्शनी जरी वाटत असली तरी ही कायदेशीर लिव्ह इन रिलेशन्शिप नाही.

 या संबंधात दोन फार महत्त्वाचे मुद्दे आहेत : (१) "पत्नी बरीच वर्षें अर्धांगवायूनें बिछान्याला खिळून होती ", ती सक्षम नाही म्हणून हे चालू शकलं नाही तर असे संबंध व्यभिचार (ऍडल्टरी) या कलमाखाली गुन्हा आहे. (२) "दुसरीला पण एक मुलगा आहे आणि तें दुसरें कुटुंब पण सुखी आहे" :  तिला बहुदा पती नाही म्हणून हे चालू शकलं,  पती असेल तर असं करणं (माझ्या मते) अयोग्य आहे.

भारतात तरी विवाहितांचे असे संबंध व्यभिचार म्हणून सरळ सरळ आय. पी. सी. खाली  येतात आणि बाधीत व्यक्तीच्या तक्रारीनी शिक्षेला पात्र ठरतात, म्हणजे तिच्या पतीनी तक्रार केल्यास सदरहू सज्जन गृहस्थांवर पोलीसांच्या विचारपूस आणि सरबराईमुळे  'संबंध नसते तर बरं'  इतपत मनस्ताप करण्याची पाळी येऊ शकते.

हे इतकं स्पष्ट लिहीण्याचं कारण 'विवाहीतांचे विवाहेतर सहजीवन' हा दखलपात्र गुन्हा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 'अविवाहितांचे विवाहा-शिवाय सहजीवन' बेकायदेशीर नाही असा आहे.

लेखनाचा विषय ' अविवाहित व्यक्तींचे विवाहा-शिवाय  सहजीवन' असा आहे आणि लिव्ह इन रिलेशन्शिपला तोच अर्थ अभिप्रेत आहे.

संजय