मला स्वयंपाक करायला खूप आवडते. माझा छंद आहे लोकांना खायला घालण्याचा. आणि त्याचाच उपयोग करून मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच ' केटरींग' करत होते.

आता अमेरिकेत आहे. इथे आल्यापासून पॉटलक प्रकरण ओळखीचे झाले. आणि खूप आवडले. मग माझी हौस पुरेपूर वसूल झाली. मी उत्साहात अवघडातला अवघड पदार्थ करायचे. [आणि नवऱ्याचा ओरडा खायचे हा भाग वेगळा!!!....] आणि असे पॉटलक करता करता आता मैत्रिणींच्या प्रोत्साहनाने 'केटरींग' चालू केले. इथेही. छान चालू आहे.

तर सांगायची गोष्ट अशी की मला स्वयंपाकात तळणे ही गोष्ट आजिबात आवडत नाही. २२ ऑक्टोबरला  इथे आमच्या गावात 'संतूर वादनाचा' कार्यक्रम होता. तर त्याच्या मध्यंतरात 'वडापावचा' स्टॉल लावण्याची मला विनंती झाली. सगळ्यांच्या आग्रहाखातर हो म्हणले. पण मला तळण्याचे दडपण आले होते. आणि अखेर ११० वडे बनवले. आणि ते लोकांना इतके आवडले की २० मिनिटात फस्त!!!!!!!!!! ५०% पेक्षा जास्त गोऱ्या लोकांनी आवडीने खाल्ले. आणि मला भेटून आवडल्याचे सांगितले. खूप आनंद झाला. आता बटाटेवडे करणे खूप आवडायला लागले आहे.