>>संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण असल्यामुळे अत्यंत मनस्वी आहार हा जीवनातला फार मोठा आनंद आणि आरोग्याचा आधार आहे.
हे जरा समजले नाही. मनस्वी ह्या शब्दाचा अर्थ काय? जे आवडते ते? तसे असेल, तर 'प्रचलित' आवडते पदार्थच जर खात राहिले (उदा. पुरणपोळी, बटाटे वडे, नुडल्स, इ. ) तर शरीराचे कसे होणार?
>>तुम्ही माना किंवा किंवा मानू नका, निसर्गाचा सर्व प्रयत्न पुनर्निर्मीती
आहे त्यामुळे सक्षम शरीरात प्रणयाची शक्यता नेहेमी जागृत असते. प्रणयाची ही
क्षमता माणूस सृजनासाठी वापरू शकतो मग ते गाणं असेल, कविता असेल, गद्य
लेखन असेल किंवा चित्रकला असेल, ज्यात तुम्हाला गती आणि रूची आहे अशा
कोणत्याही प्रकारचं सृजन तुम्ही करू शकता.
हा विचार आवडला ... आणि मनापासून पटला.