असा अनुभव आहे, इथे नुसती चर्चा होते.
फक्त माणसाच्या मुलानि 'काय खायचं' याचा निर्णय पालक घेतात इतर सर्व सजीव सृष्टी आहारासाठी ' भूक, चव आणि गंध' या निसर्गानी दिलेल्या संवेदना वापरते आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहतं.
प्रत्येक माणसाचा एक फार मोठा गैरसमज आहे की आपलं शरीर अनंतकाळ टिकेल आणि त्यासाठी तो आहाराचा उपयोग करतो त्यामुळे चवीपेक्षा अन्नातल्या घटक पदार्थांचं विश्लेषण महत्वाचं मानलं जातं, म्हणजे तुम्हाला आवडली असेल आणि खावीशी वाटत असेल तरी तुम्ही मनसोक्त पुरणपोळी खाणार नाही, अशानी अतृप्ती राहते आणि हे प्रत्येक आवडत्या पदार्थाच्या बाबतीत घडत राहतं त्यामुळे शरीर त्याला काय हवंय ते सांगायचं बंद करतं! मग आपण 'वेळेवर' आणि लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर, रीच प्रोटीन असं उगाच काहीच्याबाही खात राहतो त्यानी जेवणातली मजा निघून जाते, तो केवळ एक शारीरिक उपचार राहतो. वास्तविक भूक हा आहाराचा एकमेव निदर्शक आणि निर्देशक आहे. तुम्ही 'भूक लागेल तेव्हाच' आणि 'भूक सांगेल ते' खाऊन बघा तुमचं शरीर तृप्त झाल्यानी तुमचं आरोग्य उत्तम राहिल.
संजय