व्यंगचित्रांतून समाजाच्या विविध अंगांवर, राजकारण, अर्थकारण, सामान्य जीवन यांवर समर्पक विनोदी किंवा मार्मिक टिप्पणी करता येते. अशी व्यंगचित्रे इथे पाहावयास आवडतील.
तसेच विविध पारंपरिक व आधुनिक कलांविषयी, कलावस्तू, कलाकार, प्रदर्शने इत्यादींविषयी माहिती, सादरीकरण, मुलाखती, लेख इत्यादीही वाचायला आवडतील.
उद्योजकांच्या मुलाखती, त्यांचा प्रवास, त्यांनी दिलेली माहिती, त्यांच्याकडून किंवा विविध संस्थांकडून हरहुन्नरी/ होतकरू तरुणांना मिळू शकणारी मदत यांविषयीही वाचायला आवडेल. महाराष्ट्रात किंवा भारतात निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्य, त्यांचा प्रवास, आवाका इ. माहितीही वाचायला आवडेल.