या दोघांचे समीकरण आहे असे बहुधा मानले जाते व त्यामुळेच इतर जातीतील लोक बहुधा संघाकडे वळत नाहीत. एकुण ब्राह्मणांपेक्षा इतर जातीयांची संख्या बरीच जास्त आहे हे सर्वज्ञात आहेच. गोडसे हे आणखीन एक कारण! 

संघाबद्दलची आस्था / श्रद्धा खरे तर ब्राह्मण समाजातील आजच्या पिढीतही कमीच असावी. त्यामुळेच कुठे शाखा भरलेली दिसली तर त्यात बहुसंख्य वृद्ध असतात.

मात्र, संघाने कार्य केलेले निश्चीतच आहे. संघाने 'भाजप' ही आर्म मेंटेन केल्यामुळे खुद्द संघाबाबत मार्केटिंग करणे राहून गेल्यासारखे वाटते. 

मुळात संघ म्हणजे प्रतीसरकार असू शकत नाही. तो मला एक जगण्याचा मार्ग वाटतो. सिमीशी तुलना चुकीची वाटते. गांधी / नेहरू घराण्यात 'वारसा' हक्काने पंतप्रधानासारखे सर्वोच्च पद मिळत आले आहे व ते मिळताना काडीचाही अनुभव नसलेला माणूस एकदम पंतप्रधान झाल्याचेही उदाहरण आहे. (राजीव गांधी). त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी संघाबाबत असे बोलावे हे हास्यास्पद आहे. संघाच्या कार्यालयांमध्ये किंवा हनुमानाच्या मंदीरात शस्त्रे मिळाल्यचा एकही दाखला नाही. संघाने मुस्ल्मविरोध केलेला आहे तो का केलेला आहे हे जर एखाद्या संघाच्या माणसाला प्रत्यक्ष विचारले तर तो जे सांगतो ते पटू शकेलही. (मला पटते - व हे विधान जातीय / धार्मिक स्वरुपाचे नाही. ) पाकिस्तानात झालेल्या अत्याचारांमधून पोळून अनेक लोक संघाकडे आले याचे एक सर्वज्ञात उदाहरण म्हणजे अडवानी! पाकिस्तान्यांनी केलेले अत्याचार निश्चीतच 'भारतीय' समजून केलेले नव्हते व त्यामागे धर्म हेच कारण होते. 

निधर्मीवाद त्याला शोभतो ज्याला 'इतर कुणी आपल्या धर्मावर किंवा निधर्मीवादावर हल्ला केला' तर हल्ला करणाऱ्याला शासनही ठोठावता येते. आपण अजूनही अतिरेकी पाळत बसतो तुरुंगात! आपला निधर्मीवाद बुळचट आहे हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. सामर्थ्यवान माणसाने निधर्मीवाद जोपासणे व दुबळ्याने तो जोपासणे यात फरक आहे. अशामधूनच संघासारख्या संघटना उभ्या राहतात असे मला वाटते.

मात्र, संघाने अशा कार्याची, भूमिकेची आवश्यक तेवढी जाहिरातबाजी केलेली नाही हे सत्य असून हल्ली चाळीतल्या एखाद्या मुलाच्या बाराव्या वाढदिवसालाही त्याचे होर्डिंग लावणाऱ्या पक्षांच्या तुलनेत हे नक्कीच श्रेय देण्यास पात्र आहे असे वाटते. 

धन्यवाद!