जगातील प्रमुख राष्ट्रांमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी शिफारस केली, तर त्याचा सहसा वाईट परिणाम होतो. राजकीय नेत्यांचे काम एका समाजाची निर्मिती करणे व त्यासाठी योग्य असे कायदे करणे हे आहे. त्यांना महाविद्यालयात प्रवेश, बांधकामातील कंत्राट, पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका असल्या गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्रगत राष्ट्र बिलकूल देत नाहीत. हे केवळ युरोप अमेरिकेत होत नाही तर काही अरब राष्ट्रे, तुर्कस्थान, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर येथेही पाहावयास मिळते.
संदर्भ:- एका दिशेचा शोध, लेखक- संदीप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे

वासलेकरांनी सांगितलेला त्यांचा अनुभव अंतर्मुख करणारा आहे. आपल्या देशात राष्ट्रकुल सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालेला गैरव्यवहार जगभरात आपली नाचक्की करणारा ठरला. कालपर्यंत महसूल खात्याला अनधिकृत दिसणारा प्रकल्प २४ तासांच्या आत नियमित होतो.  शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मंजूर झालेल्या घरकुलावर चक्क मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकांनी कब्जा करणे.  या सगळ्या गोष्टी उबग आणणाऱ्या आहेत.  वासलेकरांनी उल्लेख केल्याप्रमाणे बाहेरच्या राष्ट्रातील राजकारणी जे नाही करत तेच कार्य आपले राजकारणी करतात म्हणून सध्या आपल्या देशात अराजकीय परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटते. जे राजकारणी असे कार्य करतात त्यांना सत्ता, मान, मरातब मिळते.

अधिक माहितीसाठी- दुवा क्र. १