हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
रोज येणारा दिवस म्हणजे मोत्याच्या माळेतील एक मोती. पण! हे मोती आता संपत आले आहेत. दोनच महिने पुरतील इतकेच मोती उरले आहेत. काल त्याचा छोटासा अनुभव आला. काय बोलू तिच्याबद्दल? देव दर्शनाला जातांना देवाच्या चरणातील चाफ्याचे फुल, ज्याच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित होते. तिचे बोलणे, तिचे पहाणे. तिचे रूप, ती जशी सोन्याच्या भांड्यात रेशमी वस्त्रात ठेवलेला हिरा, आणि तिची कांती म्हणजे हिऱ्यावर पडलेलं सूर्याची किरणे. त्या झगमगाटात दिवस न्हाऊन निघाला. ते दोन बोलके नेत्र, अस वाटत ते क्षणात बोलायला ...
पुढे वाचा. : सोन्याचे दिवस