सर्वप्रथम, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
हा एक सूचक आणि सांकेतिक अंगाने बोलणारा लेख आहे.
राजगड आणि तोरणा हे संस्कारांद्वारे आदर्श आचरण तेवत ठेवणारे समाजातील घटक आहेत.
वारा हा शारीरिकदृष्ट्या दुर्बल पण आशावादी वर्ग आहे. तो वर्तमानात घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होतो.
इथे, निसर्ग म्हणजेच अखंड समाज! तो प्रत्येकच गोष्टीला व्यक्त होतो... मूकपणे... नाकर्तेपणे!
वास्तविक, आपला समाज हा कायम एका नेत्याची, तारणहाराची आणि संरक्षकाची अपेक्षा ठेवणारा समाज राहिला आहे.
ही गोष्ट श्रीकृष्णापासून गांधीजींपर्यंत सर्वांच्याच बाबतीत लागू ठरते.
योग्य नेतृत्व मिळाल्यास हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतो; अथवा तो असहकार करण्यातच धन्यता मानतो.
त्यामुळे आपण म्हणालात, त्याप्रमाणे कोणामध्ये तरी शिवाजी संचारावेत, हे आवश्यकच. अर्थात, ती जबाबदारी प्रत्येकाने स्वतः घेणे कधीही उपरोक्त.
थोडक्यात काय, अन्य कोणत्या नावाने... पण शिवाजीचा जन्म अत्यावश्यक आहेच!