रोहिणीवहिनी,
आपण पोळीची इत्थंभूत पाककृती दिलीत ते खूप बरे झाले. ह्यावरून अधिक लोकांना पोळ्या करायची प्रेरणा मिळो.
एक प्रश्न - कणीक कोणती आहे त्याप्रमाणे मळण्यात / तेल पाणी ह्यांच्या प्रमाणात बदल करावे लागतात का? उदा० महाराष्ट्रात मिळणारा सर्वसाधारण गहू गिरणीतून दळून आणलेले पीठ, अन्नपूर्णा पीठ, पिल्सबरी पीठ इत्यादी. इंग्लंडाअमेरिकेत कोणती चांगली पिठे मिळतात?
आपला
(पोळीप्रेमी) प्रवासी