अहो लक्ष्मीसहोदरीताई, तुमचे म्हणणे अजबच आहे असे वाटते.
काही सदस्य इथे एकाच दिवसात, एकापेक्षा जास्त, चांगल्या/वाईट कविता लिहितात ते चालते. पण बरा/चांगला लघुनिबंध नको, असे का?
म्हणजे हीच रोजनिशी एखादी मुक्तछंदातली रटाळ कविता म्हणून लिहिली तर चालेल, पण बरा लघुनिबंध म्हणून नाही चालणार. म्हणजे कवी असाल तर लेखन स्वातंत्र्य पण लेखक असाल तर नाही, असे म्हणायचे आहे की काय?