आपण शुद्धलेखनाविषयी जी कळकळ दाखवत आहा, ती अतिशय उत्साहवर्धक आहे.
आम्ही मराठी लेखन व्याकरणाची उपलब्ध पुस्तके आणि माहिती ह्याद्वारे शुद्धिचिकित्सक सदोदित समृद्ध करीत आहोत. त्यात काही त्रुटी राहून गेल्या आहेत आणि त्या सुधारण्याचा आमचा प्रयत्न थांबलेला नाही. हे करीत असताना अनेक अनुत्तरित शंका आमच्या मनात तयार झालेल्या आहेत, त्या आम्ही येथे नंतर मांडूच.