प्रवासी,
एक प्रश्न - कणीक कोणती आहे त्याप्रमाणे मळण्यात / तेल पाणी ह्यांच्या प्रमाणात बदल करावे लागतात का?
नाही.
अमेरिकेत durum चे पीठ सगळ्यात चांगले आहे.
भोमेकाका,
कणीक मळताना कधीही भसकन पाणी घालु नये. थोडेथोडे घालावे. कणीक भिजवताना उजव्या हाताची चार बोटे कणकेमधे घालुन गोलगोल फिरवावी. (थोडक्यात food processor मधे जशी क्रिया होते तसेच करावे), म्हणजे कणीक ओली होउन एकत्र येते. शिवाय आपल्या हाताला अंदाज येतो की कणीक सैल भिजते आहे की घट्ट. कणीक घट्ट पण नको आणि सैल पण नको. ते सवयीने कळते. तुम्हाला ज्या व्यक्तीचा खूप राग आला असेल तो सगळा राग कणीक मळताना काढावा, नक्की चांगली कणीक भिजेल.
btw तुम्हाला दोघांना पोळ्या बनवता येतात का?
रोहिणी