शुद्धलेखनासाठी मो.रा.वाळिंबे यांचे शुद्धलेखन प्रदीप हे पुस्तक वापरल्याचे मला स्मरते.
 
माझा अनुभव असा आहे की शुद्ध शब्दात आपण जगायला लागलो तर सहजच शुद्ध लिहू सुद्धा लागतो.  ग्रेस, सुरेश भट, पाडगावकर यांचे वाचन किंवा वाचनच कश्याला साधे संवाद देखील आपण ऐकले तर असे जाणवते की ते महानुभाव शब्द शुद्ध जगतात, शब्द चावून चावून उच्चारतात. 
 
जर आपल्याला भी ऽऽ ती वाटली नाही फक्त भिती वाटली तर त्याला मी अशुद्ध शब्द जगणे म्हणेन.  माझा अनुभव असा की मी जमेल तेंव्हा जमेल तसे शब्द शुद्ध जगायचा प्रयत्न करतो आणि या पद्धतीने बरेच शब्दांचे शुद्ध स्वरूप जगण्यात भिनते.
 
आपण शुद्ध लिहावे अशी तळमळ अतिशय आवश्यक आहे.  व आपण बरेचदा अशुद्ध लिहितो याची जाणीव व स्वीकार करण्याची तयारी पण हवी.
 
सौमित्र