'नवीस' हा प्रत्यय कोणत्या भाषेतील आहे? फडणीस हे आडनाव खरे फडणवीस आहे असे ऐकले आहे. म्हणजे फडाची व्यवस्था बघणारा तो फडणवीस असे आहे काय? नाना फडणीस फडाचीच व्यवस्था बघत असत! (न चा ण झाला असावा.) चिटणीस, सबनीस इ. आडनावे अशीच आली आहेत काय?  

बंगालमध्येही महालनबीस, खासनबीस अशी आडनावे आहेत. (तिथे अर्थातच नवीस चे नबीस झाले आहे.) तेही महालाची व्यवस्था पहाणारा, खाश्या स्वाऱ्यांची व्यवस्था पहाणारा असे आहे का?

मीरा