सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:
सुनिल ढेपेमाझ्या पत्रकारितेची सुरूवात १९८७ मध्ये झाली. त्यावेळी अणदूरमध्ये सोलापूरहून प्रसिध्द होणारा संचार, केसरी येत असत. संचार हा खिळे-मोळे जोडणी करून साध्या मशिनवर, तर केसरी ऑफसेटवर पण कृष्णधवल निघत असे. त्यावेळी रंगीत वृत्तपत्रे नव्हती. योगायोगाने मला केसरीचा वार्ताहर होण्याची संधी मिळाली. गावात घटना घडल्यानंतर एका साध्या कागदावर बातमी लिहून पोस्टाने पाठवत असे. ही बातमी तिस-या किंवा चौथा दिवशी प्रसिध्द होत असे. अपघाताची किंवा महत्वाची बातमी असेल तर सोलापूर गाठत असे. अपघातात एक किंवा दोन ठार झाले तरी ती त्यावेळी पहिल्या पानाची बातमी ठरत ...