मीराताई,

नवीस हा प्रत्ययाचा शब्द फार्सीतूनच आला आहे. नेवेश्तन ह्या फार्सी क्रियापदापासून नवीस हे नाम तयार झाले आहे. नेवेश्तन म्हणजे लिहिणे. नवीस म्हणजे लिहिणारा. मराठीत त्याचे नवीस, नीस, णीस, णवीस असे रूपांतर झाले.

फडनवीस म्हणजे फड लिहिणारा असा शब्दशः अर्थ काढता येईल. पण व्यवस्था लावणारा असा अर्थ खरा. फड हा शब्द फार्सी फ़र्द शब्दापासून आला असावा. फ़र्द म्हणजे व्यक्ती, माणसे. उर्दूतले वाक्यात उदाहरण म्हणजे इतने फ़र्द ज़ख़मी हुए.

भटनवीस