सोवळे ओवळे हा आपणच निर्माण केलेला प्रकार आहे, त्यामुळे जास्ती विचार करू नका, जेव्हा केव्हा सिद्धिविनायकाचे पूजन कराल, तेव्हा ते मनापासून करा म्हणजे झाले.
उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेविषयी सोवळे-ओवळे कडक पाळले पाहिजे असा दंडक का पडला असावा कोण जाणे.
खालील दुव्यावर बरेच रोचक विषय समजले, उपयुक्त ठरेलसे वाटते म्हणून दुवा देतो.
दुवा क्र. १
अजून थोडे वैयक्तिक सांगायचे झाले, तर मी स्वतः घरी गणपती करून तोच गणपती बसवतो. ३-४ वर्षापूर्वी मी उजव्या सोंडेचा गणपती केलाहोता, तेव्हा माझ्या घरच्यांनी मला अजिबात विरोध केला नाही. उलट माझी आई म्हणाली, की गणपती विघ्न हरण करणारा आहे, तो कुठल्याही रूपात (उजव्या / डाव्या सोंडेचा) असला तरीही तो भक्ताला संकटात टाकणार नाही.
मी निःशंक होऊन मूर्ती केली.आणि त्या वर्षीचा गणेशोत्सवही गणेशाच्या कृपेने यथासांग पार पडला.