हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
चार दिवसांच्या ‘गृह’वासा नंतर मी कंपनीत जाण्यासाठी उतावीळ झालो असतो. बसमध्ये बसल्यावर मन अप्सरेच्या विचारात बुडून जाते. फक्त ती ती आणि ती. दुसरा विचारच डोक्यात नसतो. कंपनीत गेल्यावर मी डेस्कवर जातो. पण ती तीच्या डेस्कवर नसते. मी संगणक चालू करतो. माझे चुकून एका मुलीकडे लक्ष जाते. तीचा चेहरा माझ्या विरुद्ध दिशेला असल्याने ‘अप्सरेपेक्षा अजून सुंदर कोण आहे?’ अशी शंका येते. मेंदू मला ‘हे चुकीचे आहे’ असे सांगायला सुरवात करतो. मी खजील होतो. पण मन ती अप्सरा आहे अस म्हणायला सुरवात करते. ‘ती कोण?’ याविषयावर मेंदू आणि मन यात द्वंद सुरु होते. ...
पुढे वाचा. : मम