नमस्कार.
आपण दिलेला दुवा माहीतीपूर्ण आहे.
विशेषतः श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टींचा उहापोह मला आवडला. आई ही थोडी कोमल अंतःकरणाची असल्याने बाळाचे प्रेयस बघते तर वडील हे बरेचदा कडक शिस्तीचे असतात आणि बाळाचे श्रेयस बघतात. या दोन गोष्टींमध्ये कधीकधी फारकत असू शकते आणि गणपतीची सोंड डावीकडे वळलेली आहे की उजवीकडे वळलेली आहे ते याच दोन बाजू दर्शवतात असे या दुव्यामध्ये म्हटले आहे. माहीती रोचक आहे.
आपण बनविलेली गणेशमूर्ती अतिशय लोभस आहे. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.