त्याच्या शतकात दोन षटकार होते.

यामध्ये श आणि ष चा उच्चार वेगळा आहे खरा.  तुम्ही दिलेले स्पष्टीकरण नक्कीच विचार करण्यास भाग पाडते.

पण, म्हणजे, श / ष चा उच्चार श / ष नंतर येणाऱ्या अक्षरावर अवलंबून नाही का? उदाहरणार्थ, शतकात मधला श उच्चार करताना जीभ टाळ्याकडे जात नसली तरी शंभर मधला श उच्चार करताना मात्र टाळ्याकडे जाते असे वाटते. याउलट श / ष शब्दाच्या शेवटी आला तर शीळ वाजवताना होते तशी रचना झाल्यासारखी मलातरी जाणीव होते.