प्रणव म्हणजे ॐकार ह्याच्या ऋषींनी केलेल्या काही व्याख्या विचार करण्यासारख्या आहेत.
१)प्र+नु= प्रकर्शाने स्तवन करणे ईश्वराचे.
२)प्रकर्शेकरून नव आहे म्हणजे नित्यनूतन असा ईश्वरभाव.
३)"अवति"=रक्षण करतो तो ॐ प्रणते अवति इति ॐ,म्हणजे नम्र झालेल्यांचे रक्षण करतो तो
४)प्रणव किंवा ॐकार म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा उच्चार करताच शांत वाटते.
५)प्रणामयति इति प्रणवः म्हणजे जो चारी वेदार्थांस आपल्या साधकापुढे हात जोडायला लवतो.