खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसऱ्या कुणासोबर घडणार नाही:

"माझे सगळे उपाय करून झाले. ते आयडीयावाले जुमानले नाहीत.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसऱ्याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले. त्या दिवशी त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसरा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.
मग मी पुन्हा कागदपत्रके दिली.
पूर्वीचा नंबर चालू झाला. मी कस्टमर केअरला विचारून खात्री सुद्धा केली, की माझा अॅड्रेस वगैरे सर्व पोहोचले आहे का.
ते हो म्हणाले.
पुन्हा दिवाळीच्या आदल्या दिवशी एसएमेस आला की कागदपत्रके अपूर्ण आहेत, ते द्या अन्यथा सेवा बंद करण्यात येईल.
मी कॉल केल्यावर ते म्हणाले की कागदपत्रके पुन्हा जमा करावी लागतील.
त्याचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही.
फक्त पुन्हा कागदपत्रके पाहिजेतच असे सांगितले.
मग मी माझा प्रीपेड बॅलंन्स दुसऱ्या आयडीया नंबरवर ट्रान्सफर करण्याची शक्कल शोधली आणि आता पुन्हा कागदपत्रके जमा न करण्याचा व माझा नंबर अनिच्छेने कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला.
एका दिवसाला फक्त तीन वेळा ५० रुपये असे १५० रुपयेच फक्त ट्रान्स्फर होवू शकतात. ते मी केले.
पण अजून बॅलन्स शिल्लक होता.
पण त्यांना हे कळले असावे, तर त्यांनी ४८ ऐवजी २४ तासातच सेवा बंद कली.
आता बोला!!
म्हणजे बॅलन्स खाण्याचा हा प्रकार आहे. "

महत्त्वाची माहिती:
आयडीया टू आयडीया उरलेली बॅलन्स आपणांस दुसऱ्या आयडीया वर ट्रान्सफर करायचा असल्यास असा करा:
GIVE मोबाईल नंबर 50 असा एसएमएस करा ५५५६७ वर.
तीन वेळा.