वाळिंब्यांचे पुस्तक तर प्रसिद्ध आहेच.
परंतु 'मराठी लेखन मार्गदर्शिका' हे राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यासाठी शुभदा सारस्वत प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले यास्मिन शेख लिखित पुस्तक (मू. ८० रु.) अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे, असे आम्हाला वाटते. विशेषतः पुस्तकाच्य शेवटी 'हे शब्द असे लिहा' ही अदमासे ९००० शब्दांची विस्तृत यादी निःसंदिग्धपणे वापरता येते असे आम्ही पाहिलेले आहे.
ह्या संपूर्ण यादीची छाननी शुद्धिचिकित्सकाद्वारे करण्याचा आणि तदनुसार आवश्यक त्या सुधारणा शुद्धिचिकित्सकात करण्याचा आमचा मनोदय आहे.