टवाळराव
ह्यावेळी अनुवाद स्वैर वाटला, चाल अगदी चपखल आहे. कमळा ऐवजी मी लिलीचे फूल वापरलं
आणि थोडा स्वैरपणा कमी करण्यचा प्रयत्न केला पाहा तुम्हाला रुचतोय का.
लिला मी लिलाऽऽ अश्शी मी लिलाऽऽ
हर एकास वाटे मज, भेटावे एकटीला
ज्यासी मी देखले, जग मी भुलवीले
दिवाणा बनवीले, अश्शी मी लिला ।ध्रु।
लिला तु लिला लिला, अश्शी तु लिला
हर एकास वाटे तुज, भेटावे एकटीला
तऱ्हा प्रेमाचीही ज्यासी न अवगे
तया जीवनीची शैली न अवगे
पंथी ह्या जीवावरी, उदार जो झाला
तव जनांपरी असे हा ललनांचा मेळा
लिला मी लिलाऽऽ अश्शी मी लिलाऽऽ
हर एकास वाटे मज, भेटावे एकटीला ।१।
मज पाहुनी जो न पाहे कुणाही
मजसाठी जो संपवी स्वत:सही
त्या दिवाण्याची, होईन मी लिला
वर्षा प्रीती करीन तव, पहिल्या पहील्या
लिला मी लिलाऽऽ अश्शी मी लिलाऽऽ
हर एकास वाटे मज, भेटावे एकटीला ।२।