महाराष्ट्राने हरित आर्थिक जडणघडण करण्यासाठी प्रयत्न केले तर इतर राज्येही आपले अनुकरण करतील. हळूहळू सर्व देशात एक पर्यावरण संवर्धक अर्थनीती होईल. भारतातील प्रयोग पाहून पाकिस्तान, बांग्लादेश, चीनवर आंतरराष्ट्रीय संकट येईल.सर्वांच्या सहकार्याने हिमालयावरील संकट मागे हटून त्यास जीवदान मिळेल. हा खूप लांबचा प्रवास आहे. पण सुरुवात कधीतरी करायला हवी. त्या मार्गाने प्रवास करण्यासाठी लागणारी कल्पकता, भांडवल, सुशिक्षित युवकवर्ग महाराष्ट्रात आहे. केवळ ईच्छाशक्तीचा अभाव आहे. पण आता जागतिक राजकारण बदलत चालले आहे. मागील शतकात जगाचे राजकारण भांडवलशाही विरुध्द साम्यवाद या प्रश्नावर आधारित होते. या शतकातील राजकारण निसर्ग विरुध्द बेशिस्त उद्योग या प्रश्नावर आधारित असेल. आपण स्वतःहून पर्यावरण पोषक धोरणे बनवली नाहीत तर ती आपल्यावर बाहेरुन लादली जातील. सूज्ञाने स्वतःहून शहाणपणानॅ वागण्यात हित आहे.
एका दिशेचा शोध,संदीप वासलेकर,राजहंस प्रकाशन,पुणे.
आजचे जागतिक राजकारण कोणत्या विषयांभोवती फ़िरत आहे...?त्यांचा केंद्रबिंदू काय आहे..? हे आपल्या वरिल परिच्छेद वाचल्यावर लक्षात आलेच असेल.आपल्या देशाने स्वतःहून पर्यावरण विषयक धोरण स्वतःवर लादून घेणे काळाची आणि देशाची गरज आहे हे मला वासलेकरांचे पुस्तक वाचल्यावर लक्षात आले. असेच अनुभव व निष्कर्श आपल्यासोबत शेअर केलेले आहेत स्ट्रॅटेजिक फ़ोरसाईट ग्रुपचे संस्थापक आणि एका दिशेचा शोध या पुस्तकाचे लेखक संदीप वासलेकर यांनी. एका दिशेचा शोध या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपले आतापर्यंतचे स्वानुभव आपल्यासाठी खुले करुन दिलेले आहेत .जागतीक राजकारणात भारताला टिकायचे असेल तर कुठ्ल्या धोरणांचा स्विकार केला गेला पाहिजे ? महाराष्ट्र कशा प्रकारे देशाचा रोल मॉडेल ठरु शकतो ? जगात अशी कुठली ताकद आहे जी संपूर्ण विश्वाचे भवितव्य ठरवते ? महासत्ता शब्दाआड जागतीक राजकार कसे खेळल्या जाते ? चौथी औद्योगीक क्रांती म्हणजे काय ? का आपला देश आजही मागास आहे ? या सर्व प्रश्नांनी माझं पण डोकं भंडावून सोडलं होतं. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी शोधत होतो जी मला मिळाली याच पुस्तकात... या पुस्तकात आपण कुठे आहोत? आपण कुठे असायला हवं? आपली दिशा कोणती असावी ?या संदर्भात व्यवसतीतपणे दिशा दर्शन केलेले आहे. मला हवे असणाऱ्या , निर्माण झलेल्या बहुतेक प्रश्नांची मला उत्तरं मिळाली. त्यामुळे ज्यांच्या समोर माझ्याप्रमाणे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्यांना हे जग आणि आपल्यातले अंतर मोजायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं .
अधिक माहितीसाठी पहा- दुवा क्र. १126104087443744