हे अतिशय देखणं पुस्तक माझ्यासाठी एक दुखरी आठवण बनलं आहे. "२६ जुलै" नंतर २ दिवसांनी घरी परतले तेव्हा घरातल्या इतर गोष्टींपेक्षाही पुस्तकांची अवस्था बघून जीव तळमळला होता. ग्लॉसी प्रिंटमधलं 'शोधयात्रा' भिजून पुन्हा उघडताही येणार नाही असं दिसलेलं अजून विसरता येत नाही. पण ते टाकूनही देववलं नाही. जिनं मला वाढदिवसाची भेट म्हणून ते दिलं ती माझी बहिण आणि मी दोघीही एखाद्या जीवलगाचं जाणं पाहावं तशा दु:खी झालो होतो. त्यानंतर तशी प्रिंट निघत नसल्याचं कळलं, दुःखात अजूनच भर पडली.
माणसांपेक्षाही पुस्तकं भरवशाची वाटणाऱ्या जातकुळीतली असल्यामुळे असेल, पण ते दुःख अजूनही तितकंच ताजं आहे.
जिवंत चित्रं, मखमली पानं आणि जंगलातला थरार.... अजून विसरता येत नाही.