दोन ऑफिस कलिग्ज असतात, एक जण कायम मजेत आणि दुसरा नेहमी सचिंत. मजेत असणऱ्याचं एक रहस्य असतं कोणताही मोठा प्रश्न आला किंवा बॉसनी फैलावर घेतलं की तो बाहेर येऊन आपलं पाकीट काढून त्यातलं काही तरी बघत असतो आणि मग शांतपणे पाकीट खिशात ठेवतो की पुढच्या क्षणी परत मजा सुरू.
असं बरेच दिवस झाल्यावर संचित मित्र न राहवून त्याला विचारतो:
'तू नेहमी पाकीट काढून काही तरी पाहतोस आणि परत मूड मध्ये येतोस काय प्रकार आहे? '
' ते माझं सिक्रेट आहे.'
' अरे मला पण सांग ना कुणी स्वामी वगैरे आहेत कां? '
'नाही रे तसं काही नाही, हे बघ' म्हणून तो आपलं पाकीट उघडून दाखवतो, त्यात त्याच्या बायकोचा फोटो असतो.
' अरे, काय सपोर्ट आहे तुझ्या बायकोचा तुला' सचिंत मित्र म्हणतो
'आयला कसला सपोर्ट, मी तिच्याकडे बघितल्यावर मला बाकी सगळे प्रश्न एकदम किरकोळ वाटायला लागतात !'
संजय