पण कोणत्याही कवीला इथे तुमच्या कविता लिहूच नका अशी विनंती झालेली माझ्या आठवणीत नाही.
"सकारात्मक लिहा, नकारात्मक लिहू नका." यावरून उठलेला गदारोळ आणि एका सदस्याचे निर्गमन हे आपण विसरलेल्या दिसता.
जसे लेखक-कवींना लेखन स्वातंत्र्य आहे तसे वाचकांना पण आहे. एकदा लेखन प्रसिद्ध झाले की मग त्यावर प्रतिक्रिया उमटणारच. तसेच, सर्वच लेख/रचनांना चांगले म्हणालेच पाहिजे असा काही दंडक नाही. जशी कवी-लेखकांची वेगवेगळी प्रतिभा आणि मते आहेत तशीच वाचकांची पण आहेत. ही शाळा नाही तर मुक्त व्यासपीठ आहे. जसे तुम्ही या लघुनिबंधाला बरा म्हणालात तसे इतरजण कवितांना बरी म्हणतात. (एखाद्या कवितेला कोणी तोंडावर रटाळ म्हणाल्याचे मला तरी आठवत नाही.)
"कविता आवडली नाही तर वाचू नका! तुमच्यावर जबरदस्ती नाही." असे पण प्रतिसाद आलेले तुम्ही वाचले असतीलच. श्रोत्यांना मायबाप म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या त्याच कवींना(?) लेखकांकडून किंवा वाचकांकडून याच अर्थाचा प्रतिसाद मिळाला तर चालणार आहे का? आम्ही जे देऊ ते श्रोत्यांनी घेतले पाहिजे ही मंगेशकरी वृत्ती आहे असे वाटते.
पण एखादा लेख/कविता "आवडली नाही" असे सांगणे आणि "लिहू नका" असे सांगणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे असे वाटते.