१. आपण कोठेही पैसे भरायच्या रांगेत उभे असताना आपल्या पुढच्या व्यक्तीला अकारण खूपच वेळ लागतो आणि दुसरी रांग भराभर पुढे जाते.
...असं होऊ शकतं पण बऱ्याच वेळा ते आपल्या विचारसरणी वर अवलंबून असतं म्हणजे रिक्षावाले आपल्याला हवं तिथे यायला तयार नसतात अशी जर मनात खूणगाठ बसली तर तसेच प्रसंग परत परत घडण्याची शक्यता असते. आपण जर ओपन माइंडेड असू तर असं होण्याची शक्यता कमी होते आणि कधी घडलंच तर आपण मनाला लावून घेत नाही.
२. नवीन म्हणून एखादी डिश मागवली तर ती अतिशय बेकार निघते आणि नेहेमीचेच खाणे बरे असे वाटायला लागते.
... एका मॅथेमॅटिशिअननी मला एक फार मजेदार गोष्ट सांगीतली होती, तो म्हणाला : 'आय मेक मेनी मिस्टेक्स मेनी टाईम्स बट नॉट द सेम मिस्टेक सेकंड टाईम!'
३. झोपेत असताना आपण पाय घसरून पडतोय असे वाटते आणि जोरात दचकायला होते.
... येस, पण मला याचं उत्तर माहित नाही. अर्थात परत लगेच झोप लागते त्यामुळे मी काही याचा फरसा विचार केला नाही.
४. काहीकाही गोष्टी उगाच आपल्या हातातून पडतात किंवा परत उचलल्या तरी निसटतात.
... गोष्ट किमती असेल तर सावधानता (पूर्ण अवधान) हा एकमेव उपाय आहे
५. एखादी वस्तू आत्ता इथेच ठेवली होती असे म्हणत असताना ती अजिबात दिसत/सापडत नाही.
... याला बॅक ट्रॅकिंग हा उपाय आहे म्हणजे त्या वस्तूबद्दल आपल्याला स्मरत असलेला शेवटचा धागा पकडून मागं जायचं की ती वस्तू चक्क डोळ्यासमोर दिसते!
६. खूप दिवस सातत्याने एखादी मालिका बघत असू तर त्याचा महत्त्वाचा किंवा अंतिम भाग चुकतो.
... मी टि व्ही अजिबात बघत नाही त्यामुळे काही सांगता येत नाही
७. कोणाच्या तरी मरणाची बातमी आधीच जाणवते.
...असा फारसा अनुभव नाही
८. आवडत्या गाण्याचे कडवे ते सुरू व्हायच्या आधीच गावे तर भलतेच कडवे सुरू होते. (माझ्या परिचयातले असे होण्याला 'गल्ली चुकली' म्हणत! )
...मला पाठ असलेल्या सगळ्या गाण्यांचा नेमका मूड काय आहे ते मला माहिती असल्यानी असं होत नाही आणि खरं तर ते गाणं त्या नेमक्या पकडलेल्या मूड मुळेच तर आवडलेलं असतं आणि म्हणून तर पाठ झालेलं असतं!
संजय