आजकाल मराठी शब्दांना नपुंसकलिंगी करायची फॅशन आली आहे. आजच्या लोकसत्तात पुण्यासाठी आणखी एक विमानतळ असावा, आणि सरकारी विमानतळ शक्य नसेल तर खासगी विमानतळ सुरू करावा अशी  सूचना विमान उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे, अशी बातमी छापून आली आहे. या बातमीत विमानतळ हा शब्द १८ वेळा आला आहे आणि त्यांतील ८ वेळा तो नपुंसकलिंगी आणि बाकी वेळा लिंगनिरपेक्ष छापला गेला आहे.  विमानतळ या शब्दाच्या जन्मापासून तो शब्द मराठीत  पुल्लिंगी असल्याचे माहीत होते. आज अचानक तो नपुंसकलिगी कसा झाला?
जिरे-मिरे नपुंसकलिंगी आहेत असे समजून त्या शब्दांची जिरं-मिरं अशी रूपे प्रत्यही ऐकायला लागतात.  त्यापुढे आयडी आणि अकाउ‍न्ट यांची काय गत?  कालाय तस्मै नमः! ---अद्वैतुल्लाखान