इतर ठिकाणचा मजकूर चिकटवताना ही काळजी घ्यावी.

पर्याय १. इतर ठिकाणी जो मजकूर प्रकाशित स्वरूपात असतो तेथून त्याची प्रत काढावी. (तेथल्या संपादन सुविधेतून नव्हे.... तसे करायचे असेल तर पुढचा पर्याय वाचावा. ). प्रत काढलेला मजकूर नोटपॅडमध्ये चिकटवावा. तेथून त्याची प्रत घेऊन ती मनोगताच्या संपादकात चिकटवावी.

पर्याय २. इतर ठिकाणच्या संपादकांतल्या मजकुराची प्रत घेताना, त्या मजकुरात <p>
अश्या एचटीएमेलच्या खुणा असतात त्यांकडे लक्ष द्यावे. असा मजकूर जसच्या तसा नोटपॅडमध्ये आणि तेथून मनोगतावर चिकटवल्यास हे <p> इत्यादी मजकुराचे भाग गणले गेल्याने ते नाकारले जातात. असा मजकूर मनोगताच्या संपादनसुविधेत चिकटवताना तो एचटी एमेल पर्याय निवडून त्या खिडकीत चिकटवावा, आणि डिझाइन पर्याय निवडावा म्हणजे

वगैरे खुणांचा एचटीएमेल अर्थ लावला जाऊन मजकूर योग्य प्रकारे दिसू लागेल.

अडचण आल्यास येथे लिहाव्या.

धन्यवाद