सिंगापुरातल्या नाटकावरून आठवले.
त्या नाटकात मला चष्मा लावायचा होता आणि चष्मा लावून त्या नाटकात वर्तमानपत्रही वाचायचे होते! शिवाय वाचता वाचता चष्म्याआडून नायकाच्या हालचालींवर नजरही ठेवायची होती. तेव्हा मला चष्मा नव्हता. चष्मा लावायची कधी वेळ तोवर न आल्याने नेमका कसा अभिनय करावा हे मला कळत नव्हते.
प्रत्यक्ष नाटकाच्या वेळी कुणाचा तरी बहिर्गोल भिंगांचा चष्मा वापरून वर्तमानपत्र चाळणे म्हणजे दिव्य प्रकार झाला होता.