शुद्ध मराठी महोदय/महोदया,

ईमेल हा शब्द पुल्लिंगी का आहे बरे? तुम्ही एकदम ठोस आणि निश्चित असे विधान केले आहे. यावर अधिक विवेचन कराल का?

डाक "आली". पंजाब मेल "आली". याच धर्तीवर ई-मेल "आली" असे का बरे म्हणू नये?

इंग्लिश शब्दांच्या लिंगाबद्दल "मनोगत"वर याआधी अनेकवेळा चर्चा झाली आहे. आणि इंग्लिश शब्दांचे मराठीमध्ये लिंग निश्चित करता येत नाही असे अनेकवेळा नोंदवण्यात आले आहे.

क. लो. अ.