अंजू खूप मस्त विषय चर्चेस घेतला आहेत तुम्ही. मला आलेले काही अनुभव -
(१) एकदा ऑफीसमध्ये उलटा टीशर्ट घालून अस्मादिक गेले.
(२) माझी मैत्रीण कॉलेजमध्ये वेगवेगळ्या रंगाचे मोजे चुकून घालून आली होती.
(३) माझी बॉस आफ्रीकन अमेरीकन आहे जी विग घालते. तिला एका माझ्या सहकारी मैत्रिणीने जिला हे विग प्रकरण माहीत नव्हते, तिने बॉसला सर्वांसमोर विचारले "हाय बेट्टीना तू आज केस कापले आहेत का? ". बॉसचा चेहरा खूप गंभीर झाला होता पण काही बोलली नाही.
(४) लेस्ली नावाच्या एका खूप ढोल्या मैत्रिणीपुढे मी बराच वेळ "सुपरसाइझ मी" या जाडेपणावर टीका आणि जाडेपणाच्या कारणांचे उहापोह करणाऱ्या चित्रपटाचे कौतुक केले आणि मग लक्षात आले की अरे ती काही बोलत नाही आहे आणि मी देखील तो विषय तिच्यासमोर काढायला नको होता.
(५) एलन नावाच्या माझ्या मैत्रिणीने तिच्या नवऱ्याचा फोटो तिच्या मोबाइलवर मला पहील्यांदा दाखवला. नवरा खूपच देखणा होता त्यामुळे मी खूप वेळ फोटो पाहत राहीले आणि कौतुक केले. नंतर मोबाइल एलनच्या हातात परत देताना मला जाणवलं की एलनला ते जरा विचीत्र वाटलं होतं.