चूक करू नका, मग सगळं निरस होईल.

जोपर्यंत शरीर आहे तो पर्यंत शरीराचे भोग आणि उपभोग आहेत आणि त्यांची पण अफलातून मजा आहे, शरीर, भावना, विचार, हेवे-दावे सगळं आपआपल्या ठिकाणी आहे. त्याचं थोडक्यात असं आहेः

चित्रपटात पडदा आहे आणि व्यक्तिरेखा आहेत, संवाद आहेत, प्रेम आहे, नाती आहेत, गोंधळ आहे पण पडदा आणि चित्र मिळून सिनेमा आहे. पडदा नसेल तर चित्रपट कशावर आणि कसा दिसेल? आणि नुसताच पडदा असेल तर काय मजा आहे? पण पडदा कायम आहे आणि व्यक्तिरेखा, प्रसंग, संबंध बदलतायंत या पडद्याचं भान असलं म्हणजे चित्रपटाची मजा येते तो खरा वाटत नाही. निराकारचं अगदी असंच आहे एकदा निराकार समजला की जीवनाच्या चित्रपटाची मजा आहे आणि अफलातून मजा आहे कारण हा चित्रपट त्रिमिती आहे! सगळं जिवंत आणि मस्त आहे!

संजय