चैतन्य,
उपासिनी हा शब्द लिहिण्याच्या ओघात आपोआप आला. तेव्हाही तो मला जरा वेगळा वाटला होता. पण त्या वेळी तो खटकला नाही. बहुतेक उपास या शब्दाचा मूळ शब्द उपवास आणि वस् या धातूपासून होणारी स्त्रीलिंगी रूपे वासिनी (सुवासिनी, विंध्यवासिनी, काश्मीरपुरवासिनी इ. इ. ) अशा संदर्भांवरून हा शब्द मी तयार केला. त्या वेळची विचारप्रक्रिया नेमकी आठवत नाही आणि उपासक हा शब्द जरी प्रचलित असला तरी उपासिका असे त्याचे स्त्र्तीलिंगी रूप तितके कानावरून गेलेले नसल्यामुळे कृत्रिम वाटले म्हणून आणखी नेमका शब्द शोधायचा मी प्र्यत्न केला होता एवढे मात्र आठवते आहे. उपास हा शब्द मात्र उप + अस् या धातूपासून तयार करता येतो आणि त्या वेळी त्याचे स्त्रीलिंगी रूप उपासिनी होणार नाही असे मलाही वाटते आहे. कारण, वस् धातूचे नाम वास / वासिन् असे होत असल्यामुळे त्याचे स्त्रीलिंगी रूप वासिनी असे होते. अस् या धातूचे तसे रूप होत नसावे. त्यामुळे या अडनिड्या शब्दाचे काय करावे कळत नाही. पण या विषयावर तुझ्याशी चर्चा करायला आवडेल.

बाकी शांताबाई - बाई हाही लेखनाच्या ओघात केलेला थोडासा कंटाळा आहे. तो लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. यापुढे काळजी घेईन!
--अदिती