डाक/डाँक हा मूळ हिंदी शब्द. तो हिंदीत स्त्रीलिंगी आहे, म्हणून डाक आली. शिवाय डाक म्हणजे पत्रांचा गठ्ठा, केवळ एक पत्र नव्हे. परंतु त्यासाठीचा टपाल(मराठी)मात्र  आले. पंजाब मेल ही आगगाडी(स्त्रीलिंगी) आहे, म्हणून पॅसेंजर, एक्सप्रेसप्रमाणेच पंजाब मेल स्त्रीलिंगी.  ई-मेलला मूळचा प्रतिशब्द विरोप.  हा वीजाणु+निरोप असा बनला. दोन्ही घटक शब्द पुल्लिंगी म्हणून ईमेल पुल्लिंगी. 
हल्ली ईमेलला विपत्र म्हणतात.  पण मला तो शब्द आवडत माही.  पत्र म्हटले की पूर्वीच्या रीतीप्रमाणे अनेकपानी असावे. उगाच किरकोळ लांबीच्या पत्राला पत्र म्हणण्यापेक्षा निरोप किंवा चिठ्ठी म्हणणेच योग्य.