मराठी भाषेत कुठल्या शब्दाचे काय लिंग असावे हा वादाचा विषय नाही, फक्त प्रघात काय आहे ते पहायचे. काउन्‍ट म्हणजे गणना/गणती, दोन्ही स्त्रीलिंगी. तरीही (ब्लड)काउन्‍ट पुल्लिंगी. तसाच अकाउन्‍टही,  खाते नपुंसकलिंगी असले तरीही !

ट्रकला पूर्वी लॉरी म्हणत. ती स्त्रीलिंगी होती. शिवाय ट्र्क ही एक प्रकारची गाडी, म्हणून तिला काही लोक स्त्रीलिंगी समजतात. परंतु आकाराने मोठी वस्तू पुल्लिंगी असते(तुला डबा-डबी; आरसा-आरशी, तक्क्या-उशी वगैरे) या न्यायाने ट्रक पुल्लिंगी. ट्रकला स्त्रीलिंगी समजणारे फक्त मुंबईत सापडतील. त्यांच्यावर हिंदीचा परिणाम असतो.

मजा आली आणि मजा आला या वाक्यांच्या अर्थच्छटेत फरक आहे. भगवद्गीता वाचताना मजा आला असे कुणीही म्हणणार नाही, मात्र दारू पिताना मजा आला हे शोभून दिसते.

शब्दाचे लिंग ही ज्याचीत्याची पसंती असता कामा नये.  ते रूढ आहे ते तसेच ठेवावे.