मगहे पडदा आणि चित्रपटाचे उदाहरण बऱ्यापैकी समजलं. धन्यवाद.
पण हा निराकार समजायचा कसा? तुम्ही जी ध्यानपद्धती सांगितली त्यात आपण मनाला पटवतो कि आपण निराकार आहोत. पण हे तर एक प्रकारचं संमोहन झालं. आणि संमोहन अवस्था कितीही खरी वाटली तरी ति खरी नसते... कधी तरी ति उतरते. आणि मग परत ये रे माझ्या मागल्या.. आणि दुसरं असं कि या संमोहित अवस्थेत जे निर्णय आपण घेउ ते "स्वच्छंदी" अवस्थेतून आलेले असतील. मग ते लॉजीकल कसे असणार? त्यातून कार्यनाश व्हायचा संभव नाही का? थोडक्यात, हि स्वच्छंदी अवस्था कार्यकारण भाव वा परीक्षण-निरीक्षण या विचारपद्धतीला थारा देत नाही तर स्वयंप्रेरणेला प्रमाण मानते. त्यामूळे योग्य निर्णय घेण्याऐवजी काहितरी भलतच करून बसायची शक्यता नाही काय?