सारीका,

देव नाकारायला फार धैर्य लागतं आणि बाकीचे मग सारखे कॉर्नर करत राहतात पण एक गोष्ट नक्की की देव ही कल्पना आहे आणि आधार म्हणून निरुपयोगी आहे.

या आधी एक पायरी आहे ती म्हणजे धसक्या पासून मुक्ती, म्हणजे मजा वाटते म्हणून पूजा केली किंवा शांत वाटतं म्हणून नमस्कार केला (अर्थात या सगळ्या प्रक्रियात एकच गोष्ट होत असते आणि ती म्हणजे आपण स्वतःशी एकरूप होत असतो).

हे संपूर्ण अस्तित्वच देव-स्वरूप आहे आणि आपण जर कुणाचं वाईट चिंतत नाही तर आपल्या जीवनात ही  काही अघटीत होऊ शकत नाही अशी कृतज्ञता आली की मग कसलीच भीती उरत नाही.

संजय